Ticker

6/recent/ticker-posts

विवेकानंद महाविद्यालयात १२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप


 चित्रा न्युज प्रतिनिधी

भद्रावती: स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान होते.  प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यावेळी प्रा. रामकृष्ण मालेकर, प्रा. खोजराज कापगते, प्रा.नरेंद्र लांबट, डॉ. सुधीर आस्टुनकर यांच्यासह इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नरेंद्र लांबट, संचालन सानिया रामटेके,आभार प्रदर्शन आनंदी पॉल यांनी केले .कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग 11 वी च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या