लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील उसाच्या फडाला आज दिनांक 16 रोजी रविवारी भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली .या आगीमध्ये पाच एकर ऊस जळून खाक झाला. उसजळताना शेतकऱ्यांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कारखान्याने ऊस नेण्यास विलंब केल्याने शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागला असल्याची या भागातील शेतकरी बोलून दाखवीत आहेत तसेच हिमायतनर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विजेतारा ह्या जीर्ण झाले असून यांच्या दृष्टीकडे महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागून शेतकऱ्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या दुर्घटनेत करंजी येथील शेतकरी रामराव पांडुरंग सूर्यवंशी आणि श्याम दिगंबर कदम या दोन शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर 58 .63. 65. मधील अंदाजे पाच चक्कर ऊस उजळून खाक झाला आहे या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा तात्काळ करून महावितरण विभागांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारखान्यांनी ऊस नेण्यास विलंब केल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला असल्याची या भागातील शेतकरी बोलून दाखवित आहेत..


0 टिप्पण्या