आर्वी येथे वरीष्ठ स्तर न्यायालय कार्यान्वित
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा : न्याय आपले दारी या संकल्पनेतून आर्वी येथे पक्षकरांच्या हिताकरीता वरिष्ठ स्तर दर्जाच्या न्यायालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या न्यायालयाच्या माध्यमातुन पक्षकारांचे हीत जपण्याचे कार्य होईल, असे मनोगत उच्च न्यायालय मुबंई चे न्यायमुर्ती नितीन सांबरे यांनी वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
आर्वी येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालक न्यायमुर्ती उर्मिला जोशी –फलके, न्यायमुर्ती मुकुलीका जवळकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय भारुका आदी उपस्थित होते.
आर्वी येथे दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर दर्जाचे न्यायालय होण्याकरीता अधिवक्ता संघाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबाबत आर्वी अधिवक्ता संघाचे यावेळी आपल्या भाषणातून मुकुलिका जवळकर यांनी अभिनंदन केले.
पक्षकारांना जलदगतीने न्याय देण्याकरीता तसेच त्यांचा वेळ आणि पैशाची बचत करण्याकरीता आर्वी येथे न्यायालयाची आवश्यकता असल्यामुळे तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या पाठपुराव्यामुळे आर्वीकरांच्या ब-याच दिवसापासुन प्रलंबित असलेली मागणी पुर्णत्वास जात असल्याचे मत उर्मिला जोशी-फलके यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात संजय भारुका यांनी आर्वी येथे दिवाणी न्यायालयाची मागणी मान्य करुन शासन स्तरावर त्याबाबत पाठपुरावा करण्याकरीता आणि उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले. तसेच आर्वी येथील अधिवक्ता आणि पक्षकार यांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार करण्याकरीता पाठपुरावा करण्याकरीता प्रयत्न करणारे न्यायमुर्ती नितीन सांबरे, न्यायमुर्ती मुकुलीका जवळकर, न्यायमुर्ती उर्मिला जोशी-फलके यांचे विशेषरुपाने आभार व्यकत करुन या न्यायालयाच्या माध्यमातुन सामाजिक न्यायप्रती, न्याय व्यवस्थेप्रती लोकांचा विश्वास वाढेल असे उच्च दर्जाचे न्यायीक कार्य होईल असा आशावाद व्यक्त केला.
आर्वी येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर या दर्जाचे न्यायालय नसल्यामुळे मोठ्या मामल्यांकरीता आर्वी येथील पक्षकारांना वर्धा न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागत असे त्यामुळे पक्षकारांचा वेळ तसेच पैशाचा अपव्यय होत. न्यायदानामध्ये देखील प्रतिक्षा करावी लागत असे. त्यामुळे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर दर्जाचे न्यायालय आर्वी येथे असावे अशी आर्वी येथील पक्षकार, अधिवक्ता तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची ब-याच दिवसाची मागणी होती. याकरीता शासन तसेच उच्च न्यायालयाकडे सातत्याने आग्रही मागणी केलेली होती. अखेर आर्वीकरांचे दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर या न्यायालयाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्वी अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड गुरुनानक सिंघानी यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन दिवाणी न्यायाधीश श्रीमती शेजवळ-काळे व ॲड श्रीमती तवर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश, सर्व तालुका अधिवक्ता संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या