चित्रा न्युज प्रतिनिधी
मोहाडी :- तालुक्यातील हरदोली येथे बुद्ध वासी चंदन महादेव गजभिये यांच्या प्रथमच पुण्यस्मरण दिवस दिनांक-05/03/2025 बुधवार रोजी सायंकाळी 8 ते12 पर्यंत आयोजित केला, यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले, यावेळी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम, शाहीर रमेश रामटेके, शंकर मोतकर, दिलीप मेश्राम, शाहीर गणेश मेश्राम, अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, गायिका वर्षा गाढवे, गायिका उषा मेश्राम, विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, कार्यक्रमाचे आयोजक राजेश गजभिये, राहुल गजभिये, इत्यादी गावातील नागरिक गायक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या