Ticker

6/recent/ticker-posts

उष्णतेच्या लाटेपासुन बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सुचना

          
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा  : मार्च महिन्यापासुन वर्धा जिल्ह्याचे सरासरी तापमानात वाढ होउुन उष्णतेच्या लाटेपासुन शारीरीक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी  नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सुचना प्रशासनाने केल्या आहे. 
 काय करावे
 तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सछिद्र  सूती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी  डोक, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी  होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी , तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादीचा वापर करावा. अशक्तपण, स्थुलपणा, डोकदुखी, सतत येणारा घाम इतयादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळाखवीत व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंक्षे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सुर्यप्रकाशाचा थेट सबंध  टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असतांना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर  कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उनहापासून संरक्षणाकरीता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. 
 काय करु नये
 लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेले व पार्क केलेले वाहनात ठेऊ नये, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत  उनहात बाहेर जाणे टाळावे, गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे,  बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरीक रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या  उघडी  ठेवण्यात याव्या, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वान्मथी सी यांनी कळविले आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या