Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी विहार ही आमची अस्मिता -प्रा. डॉ. विद्याधर बनसोड


चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : महाबोधी विहार ही आमची अस्मिता आहे ती टिकवण्यासाठी आम्ही कुठल्याही तळाला जाऊ मात्र बुद्ध गया मुक्त करु, असे असे प्रतिपादन प्रा. डॉ. विद्याधर बनसोड यांनी केले.  

वंचित बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूर व विविध बौद्ध महिला मंडळ चंद्रपूरच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त महाबोधी महाविहार मुक्तीसाठी व महिला अत्याचार विरोधात 'शांती मार्च' दि. ८ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 
यावेळी मंचावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा तनुजा रायपुरे यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रीती उराडे, डॉ. शिल्पा टिपले, प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी डॉ. प्रीती उराडे, डॉ. शिल्पा टिपले, अ. वी. टेम्भरे, किशोर तेलतूबडे, बंडू नगराळे, सुभाष थोरात यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जटपुरा गेट पर्यंत शांती मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मार्गक्रमण करत परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात पोहचला. यावेळी बुध्दगया येथील महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे. १९४९ चा बुध्दगया व्यवस्थापन कायदा हा रद्द करण्यात यावा, देशातील व जगभरातील संपूर्ण बौध्द अनुयायाचा हा धार्मिक भावनेचा आदर करावा. महिला अत्याचार विरोधात कठोर कायदा करण्यात यावा. आरोग्यालय, शैक्षणिक केंद्रे, नोकरी व व्यवसायीक इतर सर्वच ठिकाणी महिला समुपदेशन केंद्र उघडण्यात यावे. आदी मागण्या करण्यात आल्या. या शांती मोर्चात वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा तनुजा रायपुरे, मोनाली पाटील, प्राजक्ता वाकडे, इंदू डोंगरे, सुलभा चांदेकर, शिल्पा बनकर, चंद्रप्रभा रामटेके, श्रध्दा गोवर्धन, मसुनी तावाडे, विजया भगत, ममता रामटेके, परिणीता मेश्राम,  ऋचा लोणारे, सुजाता लाटकर, छाया तामगडे, निर्मला पाटील, उषा डोंगरे,  राजकला रंगारी, वैशाली साव, लता साव, सोनल चांदेकर, पोर्णिमा जुनघरे,  विश्रांती डांगे, शोभा वाघमारे, ललीता दुर्गे, संघमित्रा मावलीकर,  मच्छगंधा ठमके,  प्रज्ञा मानकर, वंदना नगराळे, अंविता उके,  पुष्पलता कोटांगळे, दमयंती तेलंग, विद्या टेंभरे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या