Ticker

6/recent/ticker-posts

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार; हाळीतील महिलावर्ग होतात बेजार.!

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उज्वला गॅस या नावाने समाजातील शेवटच्या महिलेला गॅस सिलेंडर नमो शासन देत असल्याचे जाहीर केले. म्हणुन या भागातील अनेकांनी नको ती चुल अन् धुर,असे म्हणत उज्वला योजनेतून गॅस कनेक्शन घेतले. यामुळे घरोघरी मातीच्या चुलीऐवजी उज्वलाचा गॅस सिलेंडर आणि लाखों महिलाभगीनींच्या चेह-यावर आनंद व समाधान दिसू लागले.परंतू आनंद व समाधान हे चिरकालच टिकला.! कारण,एकीकडे गॅसचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे नंबर लावलेले कार्ड धारक वेटींगवर अन् सिलेंडर विकू लागले हाॅटेलवर ! अशी गत झाल्याने नको हा गॅस,नको त्याचा वास.! असे म्हणत बहूतांश उज्वलांनी आपली चुलच बरी.असे म्हणत सरपण गोळा करुन चुलीवरचा चवदार स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे.
याबाबत थोडक्यात असे की,चुलीचा जाळ व धुर यामुळे घरांसह महिलांचे शरीर काळवंडणे,डोळे खराब होणे यासारखे प्रकार होतात.तसेच कांही महिलांच्या शवसन नलीकेत धुर जाऊन जिवीतास धोकाही होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.या व अन्य बाबींचा विचार करुन केंद्राने कांही वर्षापुर्वी हर घर गॅस सिलेंडर असे म्हणत उज्वला या नावाने घरो घरी गॅस द्यायला सुरुवात केली.व या योजनेचा लाखो कुटूंबाने लाभ घेऊन उज्वलाचे लाभार्थी झाले.नव्याची नवलाई संपली आणि टाकीचे चढे दर तसेच नंबर लावुनही कार्डधारक वेटींगवर अन् सिलेंडर विक्री करु लागले हाॅटेलवर.हा प्रकार वाढल्याने हाळी-हंडरगुळी परिसरात अनेक महिलांनी पुन्हा गॅस घेण्याऐवजी सरपण गोळा करणे व चूलच बरी. असे म्हणत कनेक्शन कट केल्याचे समजते.
हाळी-हंडरगुळीत भारत व एच.पी. गॅसचे अनेक सबडिलर आहेत.आणि उदगीर,अहमदपुर,चाकुर,जळकोट या तालुक्यातील बहूतांश कुटूंबांचे कनेक्शन येथील सबडिलरकडे आहे यामुळे येथे रोज शेकडो सिलेंडरची विक्री होत असलीतरी बहूतांश कार्ड धारकांना वेटींगवर ठेवले जाते.अन् हाॅटेल्स,ढाबे यांना तसेच सुख,दु:खा च्या कार्यक्रमासाठी बेभावात कधीही सिलेंडर विकले जाते.आणि हा सर्व प्रकार तथा गॅसचा काळाबाजार या भागाच्या तहसील कार्यालयातील सर्व संबंधित अधिका-याला माहिती आहे.तरीही आजवर त्यांनी कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही.या मुळे गतकित्येक वर्षापासून लाभार्थी ग्राहकांना वेळेवर एक टाकी मिळणे कठीण झाले आहे.तर दुसरीकडे सार्वजनिक व लग्न कार्यात 1 नव्हे , 2 नव्हे तर 5 / 5 सिलेंडर्स बेभावात दिनदहाडे विकले जातात.यामुळे गॅसचा खुलेआम काळाबाजार होत आहे.तरीही संबंधित अधिकारी गप्प बसल्याने सबडिलर्स व सं.अधिकारी यांच्यात आर्थीक देवघेव झाल्याचा संशय हाळी हंडरगुळी परिसरातील कार्डधारकांमधून व्यक्त केला जातोय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या