Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक शौचालयाअभावी हाळी येथील व्यापारी परेशान..

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-तालुका व जिल्हास्तरावर पदाधिकारी म्हणुन विविध पक्षाचे काम बघणारे अनेकजण असुनही हाळी (ता.उदगीर) येथे महिला व पुरुषांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नाही.यामुळे व्यापारी व महिलाभगीनींची कुचंबना,परेशानी होत आहे.तेंव्हा गावात *भाराभर* पुढारी असलेल्यांनी याची दखल घेण्याचे व शौचालये बांधण्याचे कष्ठ घ्यावे,अशी जनतेची मागणी आहे..    गुरांचा आठवडी बाजार हंडरगुळी या गावात शतकापासुन भरत आहे.माञ हंडरगुळी पासून चार पावलं दुरवर असलेल्या हाळी या गावाचे नाव बाजारचे गाव म्हणुन फेमस आहे. तसेच विविध राजकीय पक्षात तालुका,जिल्हास्तरावर पदाधिकारी म्हणुन काम पाहणारे अनेक पुढारी पण हाळीत आहेत.यामुळे पुढारलेले गाव म्हणुनही हाळी गाव फेमस आहे  परंतू,हे गाव अस्तित्वात आले तेंव्हा पासुन या गावात ना-ना प्रकारच्या छोट्या-मोठ्या अनेक समस्या व प्रश्न आहेत.व त्यांची सोडवणुक करुन गावच्या विकासात,सौंदर्यात भर घालावी,असे एकाही पक्षाच्या गाव पुढा-याला वाटले नाही.असे म्हणणे चूक ठरणार नाही..!
विविध समस्या,गैरसोय यांचे माहेर घर बनलेल्या हाळी या गावातील बहूतांश हाळीकरांना आजही  चहा- पाण्यासाठी हंडरगुळीत यावे लागते. यापेक्षा दुर्देवं काय असू शकते..? असा प्रश्न जाणकार हाळीकरांतून चर्चीला जातोय.आज अनेक गावात पक्ष पदाधिकारी नाहीत.की, मोठे पुढारी.तरीही अनेक लहान - मोठी गावे विकासाच्या बाबतीत शेकडो मैल पुढे गेलीत.परंतू,अनेक पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी असलेले हाळी हे गाव विकासाच्या बाबतीत मागे का तसेच हा अमूक नेत्यांचा,मंञ्यांचा उजवा हात आहे.तर तो तमुक नेत्यांचा,मंञ्याचा आमदार तसेच खासदारांचा आहे.असे सर्वपक्षीय गावपुढा-यांना बघून बोलणारी जनता या पुढा-यांनी आजवर गावात साधे सार्वजनिक शौचालय,गटारी का बांधले नाहीत? असा सवाल उपस्थित करत आहेत.  कारण,परिसरातील अनेक गावचे नागरीक,व्यापारी व शेतकरी तसेच महिलांसह बच्चेकंपनी,अपंग,जेष्ठ मंडळी येथे ये-जा करीत असतात. आणि येथील बाजारपेठेत एक पण सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे गावक-यांना व बाहेर गावातुन येथे आलेल्या नागरीकांना जर अचानक एक नंबरला,दोन नंबरला जायचा बुलावा आला तर अनेकांची फार मोठी पंचायत होते.व सार्वजनिक शौचालय नसल्याने गावक-यांसह परगावातुन आलेल्या जेष्ठ महिला व अपंगांना कुठे करावी "लघूशंका" हा प्रश्न पडतो.आणि गावपुढा-यांना याचे ना सुख आहे,ना दु:ख आहे..!

शौचालयाअभावी व्यापारीबांधवासह ग्राहकांना विशेषत: अपंग व महिलांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, सोमेश महाजन,व्यापारी,हाळी

आसपासच्या गावातील ग्राहकांसह शेतकरी मोठ्यासंख्येनी येत असतात.पण बाजारपेठ मध्ये अत्यावश्यक असताना एकही सार्वजनिक शौचालय नाही.यामुळे जनतेची विशेषत: महिलाभगीनींची मोठी कुचंबना होत आहे.सोहेल टप्पेवाले,ग्रामस्थं हाळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या