चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला - येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी CBSE लुटीचा पॅटर्न महाराष्ट्रातील सरकारी शाळांत लागू करण्याचा डाव राज्य सरकारने आखला असून शाळा बंद करून त्याचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.
राज्यातील लाखो जिल्हा परिषद आणि महापालिका शाळा पटसंख्या आणि शिक्षका अभावी बंद केल्या आहेत. उरलेल्या शाळांना मोफत पुस्तके, गणवेश आणि बूट सुद्धा वेळेत आणि दर्जेदार पुरविण्यात नापास झालेले राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी आणखी एक बिनडोक निर्णय जाहीर केला आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी आणि दोन टप्प्यात दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी CBSE लुटीचा पॅटर्न लागू करण्याची सवंग घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपवून केंद्राच्या माध्यमातून त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
CBSE पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे ती जाड पुस्तके शिकविनार कशी? आणि कोण? ह्याची काळजी सरकारला नाही. फी वाढ होवून CBSE पॅटर्न अंगीकारत असताना त्यात केवळ ३०% महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, आणि मराठी भाषेला प्राधान्य दिले जाणार. ७०% परकीय विषय माथी मारले जाणार आहे. राज्यात धड सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात अपयशी ठरलेले शिक्षण खाते शिक्षकांना देखील CBSE अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार, अश्या वल्गना करते आहे.
हा मोफत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची संधी मिळूच नये असा सरकारचा डाव असून मराठी भाषा आणि मराठी शाळांना कायमचे कुलूप लावून अदानी, अंबानी यांच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र असून वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्रभर ह्याचा निषेध करीत निदर्शने करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


0 टिप्पण्या