Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर येथे तथागत ग्रुपच्यावतिने - महात्मा फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती २०२५ स्थापन अध्यक्ष पदी आरती दिक्षित तर कार्याध्यक्ष पदी संदिप गवई यांची निवड......

चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा :-मेहकर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिबा फुले व डाँ. बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्याच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उपक्रमाने साजरी करण्यासाठी फुले आंबेडकर संयुक्त महोत्सव समिती २०२५ स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून आरती दिक्षित तर कार्याध्यक्ष पदी संदिप गवई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मेहकर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित बैठकिच्या अध्यक्ष स्थानी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई होते.
बैठकिचे प्रास्ताविक सभा संयोजक रविंद्र वाघ यांनी केले. बैठकीमध्ये संयुक्त जयंती महोत्सव समिती २०२५ स्थापण करने, रीतसर लाऊडस्पीकर वाजवणे व मिरवणूकी साठी पोलीस परवानगी घेणे, दिनांक ११ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम आयोजित करणे, लोकवर्गणी जमा करणे, व समाज उपयोगी कार्यक्रम राबणे यासह अनेक विविध ठराव करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, मेहकर येथे स्थापण करण्यात आली. सदर समितीची पुढील कार्यकारणी अध्यक्ष आरती दिक्षित, कार्याध्यक्ष संदिप गवई, उपाध्यक्ष अख्तर कुरेशी, नितिन बोरकर, सचिव गजानन सरकटे, गौतम पैठणे , सहसचिव देवानंद वानखेडे, रमेश गवई कोषाध्यक्ष कुणाल माने तर संघटक म्हणून प्रकाश सुखधाने, संदिप राऊत तर सदस्य अस्लम गवळी, आरिफ शहा, अरुण डोंगरे, सुनिल वनारे, महेंद्र वानखेडे, श्रीकिसन लाटे, कांचनताई मोरे,वंदना ताई माने, लक्ष्मीताई कस्तुरे, प्रतिभा गवई, उषा सगट, आम्रपाली गवई, रेखा गवई,सल्लागार जेष्ठ पत्रकार फिरोजभाई शहा,पत्रकार रविंद्र वाघ,अंकुश राठोड यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र वाघ यांनी केले तर आभार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या