Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर

प्रथम अंकित लोंदासे, द्वितीय दुर्गेश लोंदासे, तृतीय सुमेध खोपे


पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती सर्व सामान्य ज्ञान स्पर्धा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझ्या मराठवाडा संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 18 मे 2025 ला स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेचा निकाल 25 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 7 वाजता जाहीर करण्यात येणार असून संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी ओ .एस .एस. कम्प्युटर अड्याळ व सनराइज कॉम्प्युटर पहेला येथील नोटीस बोर्डावर पाहायला मिळेल.या परीक्षेला एकूण 170 विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंद केली होती. परंतु प्रत्यक्षात 147 विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान परीक्षा दिली .या परीक्षेत अंकित वसंता लोंदासे 77 टक्के गुण घेऊन प्रथम आलेला आहे . दुर्गेश विनोद लोंदासे यांनी 72 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटविला. तर  सुमेध खुशाल खोपे यांनी 69 टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान मिळविला. ही परीक्षा अड्याळ व पहेला या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. परीक्षा यशस्वी करण्याकरता ओ .एस. एस. कम्प्युटरचे संचालक संजय रंगारी अड्याळ ,सनराईज कम्प्युटरचे संचालक विलास बांडेबुचे पहेला, संयोजक पंकज वानखेडे,प्राध्यापक संजना संजीव भांबोरे, कुलदीप गंधे, चेतन रामटेके ,रोशन खानोरकर ,फिनिक्स करिअर अकॅडमी चे शिक्षक यांनी सहकार्य केले. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 1001, सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र पुष्पगुच्छ, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला 701,सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,पुष्पच्छ ,त्याचप्रमाणे तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला 50 1,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन  दुपारी 3 वाजता 9 जून 2025 ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे निसर्ग रम्य ठिकाण असलेल्या दोन एकर मध्येअसलेल्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात येणार आहे .करिता प्रथम, द्वितीय ,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक पत्रकार संजीव भांबोरे यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये सन्मानपत्र देण्यात येतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या