Ticker

6/recent/ticker-posts

"एक हात देशसेवेसाठी'

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई:-जम्मू काश्मिर, पहलगाम मधील आतंकवादी भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्यास भारतीय सेना प्रतिउत्तर देण्यासाठी जीवावर उदार होऊन सिमेवर लढत आहे. अशावेळी जरी आपण सर्वसाधारण भारतीय म्हणून देशाप्रती निष्ठा राखून सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक. त्यातील एक प्रयत्न म्हणून अपना बाजार को-ऑप सोसायटी यांच्या  विद्यमाने सर जे.जे. हॉस्पिटल व सायन हॉस्पिटल यांच्या सहयोगाने दि. ११ मे २०२५ रोजी अपना बाजार कम्युनिटी हॉल, नायगांव, मुंबई येथे *भव्य रक्तदान शिबिर* आयोजित करण्यात आले. 
यामध्ये अनेक नागरिकांसह युवा वर्ग आणि महिला वर्गाने बहुसंख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे अन्यायाविरोधात बुलंद आवाज करणाऱ्या भिमसैनिक संघटनेनेही रक्तदान करून देशाप्रती निष्ठा दर्शवली.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या