Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय सामान्य ज्ञान ऑफलाइन स्पर्धा संपन्न

अड्याळ व पहेला केंद्रावर परीक्षार्थी यांनी दिली परीक्षा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे
 यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय सामान्य ज्ञान  
स्पर्धा परीक्षा आज दिनांक 18 जून 2025 ला डॉ.हरडे येथील कॉम्प्लेक्स पोलीस कॅम्प अड्याळ येथे ओ .एस. एस. कॉम्पुटर इन्स्टिट्यूट चे संचालक तथा मार्गदर्शक संजय वंजारी तथा पहेला येथे सनराइज कॉम्पुटर चे संचालक विलास बांडेबुचे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक प्राथमिक शाळा पहेला येथे घेण्यात आली . स्पर्धेत प्रथम द्वितीय ,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना 1001 ,701 ,501 ,मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 
वरील कार्यक्रमाचे आयोजन शांतीवन बुद्ध विहार चीचाळ येथे 9 जून 2025 रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. परीक्षेचे योग्य नियोजन ओ .एस .एस .कॉम्पुटर चे संचालक तथा मार्गदर्शक संजय वंजारी ,परीक्षा प्रमुख आयोजक पंकज वानखेडे ,परीक्षा प्रमुख अमित रामटेके, फिनिक्स करिअर अकॅडमी चे शिक्षक ,तथा सहकार्य रोशन खानोरकर ,चेतन रामटेके, सनराइज कॉम्पुटर इन्स्टिट्यूट चे संचालक विलास बांडेबुचे,प्राध्यापक कुमारी संजना भांबोरे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी यशस्वीरित्या परीक्षा घेण्याकरता सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या