Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी धम्माच्या अधिक गतीसाठी समन्वयाने काम करावे - अँड. एस. के. भंडारे

चैत्यभूमीत हिंदी केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिर सुरू 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई - पूर्वी मातृसत्ताक पद्धती होती, आता महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, आपल्या भारतीय बौद्ध महासभेत सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे, त्या पार्श्वभूमीवर डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार आम्ही कामाचे विभाजन करून धम्माचे काम अधिक गतिमान करण्यासाठी महिलांच्या स्वतंत्र राज्य, जिल्हा शाखा कार्यकारणी 15ऑगस्ट 2023 रोजी पासून केल्या आहेत. मात्र, पुरुष व महिला कार्यकारिणी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे नवनियुक्त ट्रस्टी, केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर येथे माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित दि.22/5/2025 ते 27/5/2025 रोजी आयोजित केलेल्या केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले. 

अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲड. डॉ. एस. एस. वानखडे होते. भंडारे पुढे असे म्हणाले की, धम्मात येण्यासाठी कमी सपोर्ट असतो पण, न येण्यासाठी परिवारातील व्यक्तींचा विरोध असतो. तरी सुद्धा आपण सहभागी झाला आहात, तरी ज्यांनी विरोध केला त्यांच्या प्रतीही आभार माना. सकारात्मक रहा त्यामुळे पुढे तुम्हाला त्यांचाही पाठिंबा मिळेल. धम्माची प्रगती होईल व यापुढे धम्म शिबिरे प्रवेश प्रक्रिया अधिक स्टँडर्ड पद्धतीने होईल. या शिबिराचा समारोप माता रमाईच्या स्मृती दिनी संस्थेचे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते उपस्थित संपन्न होईल.
      या शिबिरामध्ये महाराष्ट्र, मुंबई, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार राज्यातून एकूण मेरिटमध्ये आलेल्या 47 महिलाना प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा व केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमास राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड गुरुजी व राजेश पवार, केन्द्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख एम.डी.सरोदे गुरुजी व सुप्रियाताई कासारे, केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख रागिणीताई पवार,महाराष्ट्र राज्य महिला शाखा  अध्यक्षा स्वाती शिंदे, मुंबई प्रदेश महिला शाखा सरचिटणीस सोनालीताई कटारनवरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष स्वाती गायकवाड, मुंबई प्रदेश उपाध्यक्षा सुषमाताई कसबे,ऑडिटर सागर गांगुर्डे व सचिव संतोष मतकर, निवासी केंद्रीय शिक्षिका घोक्षेताई इत्यादी  पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सचिवा सुनंदाताई पवार यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या