चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-सन ९२-९३ दरम्यान अकलूज सारख्या ग्रामीण भागात व्यवसाय करत असल्याने अकलूज ग्रामपंचायत 'ग्रामसभा' उपस्थित राहण्याचा योग यायचा या प्रत्येक वेळी भागवतअप्पा यांची गाठभेट हमखास ठरलेली.
वाटायचं उगीचच काही तरी विषय काढत चांगल्या कामात खोडा घालून ते रेंगाळत ठेवण्यासाठी भागवतअप्पा यांना बोलत केलं जात असेल परंतु तसे नव्हते तत्वाची लढाई हा शब्द कायम बोलून मगच आम्ही विरोधक नाही सोबत असणार हेही वेळोवेळी दाखवून देणारे भागवतअप्पा ..अकलूज परिसरात "निळी टोपी" नावानेच खरी ओळख
RPI(गवई)पक्षात तालुका, जिल्हा ते प. महाराष्ट्र कार्यकारणी वर एक पदाधिकारी म्हणून त्यांनीअखेरपर्यंत काम केले. या पक्षाचे नेते तथा नागपुरच्या दीक्षाभुमी चे अध्यक्ष माजी, राज्यपाल माजी विधान परिषद सभापती दिवगंत रा. सु. गवई यांचेशी त्यांचे घनिष्ट असे संबंध तरी त्याचा गाजावाजा नाही.
अकलूज बौध्द विहार विषयावर भागवतअप्पा,पी.एस.गायकवाड,नंदू केंगार ही चळवळीतील मंडळी त्याच या संदर्भात विध्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बरोबर तात्त्विक मतभेद व्हायचे परंतु बौध्द विहार यासाठी आपण सुचवताय त्याही पेक्षा चांगल्या व मोठ्या जागेसाठी आपण प्रयत्न करू हे सूत्र पुढे या सर्वच मंडळी कडून विकास कामासाठी कायम सोबत..
आदरणीय विजयदादा विषयी कायम आदर ठेऊन हक्काचे ठिकाण म्हणून पाहणारे भागवतअप्पा पुढे ग्रामपंचायत कामा संदर्भात सार्वजनिक कामा निमित्ताने मा.बाळदादा,मा.रणजितदादा,मा.भैय्यासाहेब, मा.अण्णासाहेब, मा.शिवबाबा या सर्वांसोबतच राहिले.
आज त्यांच्या जाण्याने आपण एका चळवळीतील सच्चा भीमसैनिकास मुकलो ..
विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली..


0 टिप्पण्या