चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :+कै. आजिनाथ केचे प्राथमिक शाळा आलेगाव( खुर्द )ता. माढा जि.सोलापूर ही शाळा कोंढार भागातील एक अव्वल शाळा ठरली आहे. या शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी ध्रुव संजय माने यांने एटीएसई परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक तर मंथन परीक्षेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला तर इयत्ता दुसरी मधून सुदिक्षा वाघमारे राज्यात चौथा, ज्ञानदीप अंकुश माने राज्यात चौथा ,तर अपेक्षा भारत सोलंकर हिने इयत्ता चौथी मधून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला ,विविध केंद्रामधून
तन्मय लांडगे ,स्वराज माने, युवराज केचे ,मयुरी जाधव, विराज कोकाटे, श्रेयस जाधव, पवन जाधव,आदर्श सलगर, या विद्यार्थ्यांनी प्रथम ,द्वितीय ,तृतीय असे क्रमांक पटकावले. त्यामुळे या शाळेबद्दल पालकांचे आकर्षण वाढले असून, मार्गदर्शक शिक्षक सिद्धेश्वर सलगर यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे आवड निर्माण केली आहे तसेच मार्गदर्शक शिक्षक म्हणून मुख्याध्यापक संदीप मिसाळ, अंकुश माने , पोपट चौरे व पालकांचेही अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे.
0 टिप्पण्या