चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-एप्रिलच्या शेवटी सरपंच पदाचे आरक्षण घोषित झाल्याकारणाने या 2 गावात "कोणसी महिला बनेगी सरपंच" यावरुन जो,तो आपापल्या परीने अंदाज बांधत होता.आणि आता यात भर पडली ती म्हणजे जि. प./पं.स.या स्था.स्व.संस्थांच्या चार महिण्यात होऊ घातलेल्या ईलेक्शन ची.६ मे रोजी सर्वोच्य न्यायालयाचा "सुप्रीम" आदेश आला आणि उदगीर तालुक्यातील म्हत्वाचे व "हेविवेट" पुढा-यांचे गाव असलेल्या हंडरगुळी व हाळी मधील जाणकार मतदार व इच्छूकांत एकच चढाओढ लागलीय ती म्हणजे जि.प.व पं.स.चे आरक्षण कोणाला सुटेल,यावरुन " अंदाज अपना,अपना" लावला जातोय.
सर्वोच्य न्यायालयाने येत्या 4महिन्या मध्ये स्था.स्व.सं.(जि.प.पं.स.न.प.न. पं.महापालिका) यांच्या निवडणुका घ्या,असा "सुप्रीम" आदेश 6 रोजी दिल्याने शासन,प्रशासन व इच्छूकांने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.3 वर्षापासून प्रशासकांचे "राज" होते, म्हणुन गावखेड्याच्या विकासाला बाधा पोहचत होती.पण आता थेट "सुप्रीम" कडून आदेश आल्यामुळे प्रशासनाला निवडणुकीची लगीन घाई करावीच लागणार आहे.हे सत्य असलेतरीही हाळी-हंडरगुळीकरांचे लक्ष माञ आरक्षणहकडे आहे. कारण,या 2 गावचे सरपंचपद हे ओपन महिलांसाठी राखीव सुटलेय. म्हणुन इच्छूक कांही पुरुष मंडळीत नाराजी आहे.पण आता स्था.स्व.सं. याच्या म्हणजे जि.प.व पं.स.यांच्या निवडणुका होणार हे 100% फीक्स झाले असल्याने यामध्ये आरक्षण सुटेल असा अंदाज लावला जातोय.
लोकल पुढा-यांचा नमस्कार वाढला असला तरी ही अनेकांना त्यांचा चमत्कार माहित आहे. म्हणुन आता एकदाचे आरक्षण जाहीर झाले की मगच येथील "त्या" लोकल पुढा-यांचा पुढारीपणा बघता येईल.तसेच गत दोन टर्म पासून हळी व हंडरगुळी सर्कल वाढवणा गटात आहे.उमेदवार जिंकलाय हाळीचा..! म्हणुन जि.प.गट वाढवणचा आणि विजयी उमेदवार हाळी गावचा..!! ही स्थिती यावेळेस ही फीक्स असेल का,बदलेल.यावरुनही अनेकजण लावतात "अंदाज अपना अपना"


0 टिप्पण्या