चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-हिर्गणघाट तालुक्यातील नांदगाव (बोर.) येथे बौद्ध पंचकमिटी, रमाबाई महिला मंडळ तसेच प्रशिक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहाराच्या उदघाटन सोहळ्या निमित्ताने बुद्ध विहार परिसर, नांदगाव येथे बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
नांदगाव (बोर.) येथील दिनांक 19/05/2025 ला नवीन बुद्ध विहाराचे नामकरण करण्यात आले होते. 'तक्षशिला' बुद्ध विहार असे या विहाराला नाव देण्यात आले. नामकरणाच्या सुवर्ण क्षणी आयोजकांकडून सायंकाळी 6.00 वाजता भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता सोबतच 'स्वरनाद म्युझिकल ग्रुप' हिंगणघाट प्रस्तुत बुद्ध-भीम गीतांचे देखील आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. यावेळी नागपूरच्या सुप्रसिद्ध गायिका पल्लवी नगराळे यांनी तडफदार सादरीकरणाने आणि आपल्या सुमधूर गायनाने सर्व गावकरी मंडळीना मंत्रमुग्ध केले. तर गायक अविनाश थुल यांच्या 'भीमराव कडाडला' आणि गायक विशाल ठोंबरे यांच्या 'दोनच राजे ईथे गाजले' या गीतांवर श्रोते थिरकायला लागले. या कार्यक्रमाला 'स्वरनाद म्युझिकल ग्रुप' चे संचालक गायक अविनाश थुल, गायिका पल्लवी नगराळे, गायक विशाल ठोंबरे, गायक अशोक मेश्राम, अँकर- सुहास इंगळे, ढोलक- अक्षय ठाकूर, कीबोर्ड- लोकेश पाटील, ऑक्टापॅड- निलेश दुधाने यांची उत्तम साथसंगत लाभली.
यावेळी बौद्ध पंच कमिटी नांदगावचे अध्यक्ष आशिष बुरबुरे, उपाध्यक्ष हर्ष बुरबुरे, कोषाध्यक्ष सुरेश मानकर, सचिव सचिन बुरबुरे, तसेच गौतम फुलकर, सुधाकर बुरबुरे, मुकेश पाटील, रमाबाई महिला मंडळ चे सर्व पदाधिकारी आणि प्रशिक्ष तरुण मंडळ चे सर्व पदाधिकारी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.*
0 टिप्पण्या