Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीची रेणापूर तालुका कार्यकारणी निवड बैठक संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना एकत्रित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी  वंचित बहुजन आघाडी रेणापूर तालुका नवीन कार्यकारणी निवडीची बैठक शासकीय विश्राम गृह रेणापूर येथे पार पडली.

निवड समितीचे ॲड. रोहित सोमवंशी, इंजि. सचिन अर्जुन गायकवाड यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. सोबत लातूर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थिती होते. रेणापूर तालुक्यातील  फुले - शाहू - आंबेडकर संविधानवादी विचारधारेच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांची वंचित बहुजन आघाडी रेणापूर तालुका कार्यकारणी  निवडीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आजी -माजी पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या