Ticker

6/recent/ticker-posts

1मे रोजी मनसे कडुन तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची तहसीलदारकडुन कारवाई नाही

चित्रा न्युज प्रतिनिधी 
धुळे :-1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदारांना दिले होते निवेदन परंतु तहसीलदारांनी त्या निवेदनावर कुठलीही पद्धत ची कारवाई न करता आत्तापर्यंत व संबंधित अधिकाऱ्यांनी देखील काहीच कारवाई केल्याने त्या साठी  11 जून रोजी शिरपूर ते शाहादा या रस्त्याचे तात्काळ काम सुरू व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी जिल्हा अधिकारी यांना दिले आम्ही सदर निवेदन हे उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग क्र. १ शिरपूर यांना दिले होते. मात्र त्यांनी सदर रस्ता हा आपल्याकडे वर्ग झालेला असल्याने या रस्त्याबाबत निवेदन तुमच्याकडे करण्याचे लेखी कळविलेले आहे. त्या नुसार खालिल निवेदन आम्ही आपणाकडे देत आहोत. शिरपूर ते शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झालेली असून आपल्या प्रशासनाची याकडे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या पुलाजवळ ब.ना. कुभांर गुरुजी हायस्कूल असून शहादा, बोराडी व वाघाडी गावातील जनतेच्या वाहतुकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असतांना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू बनलेला आहे. येथे मोठ-मोठे व खोल खड्डे असल्याने नेमका रस्त्यात खड्डा की, खड्‌ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली असून प्रशासनाचे डोळेझाक व दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. यापुढे या रस्त्यावर व पुलावर होणाऱ्या कोणत्याही अपघातात राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असेल. व महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत आपणास या निवेदानातून सुचित करते की, रस्त्याचे काम तात्काळ न झाल्यास मनसे स्टाईल खळखट्याळ आंदोलन करेल.
१) रस्त्यात खड्डा की खड्‌ड्यात रस्ता याचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग विभाग देणार का ?
२) वाघाडी पुलावर होणाऱ्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग जबाबदार धरण्यात यावे व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावेत
३) वाघाडी पुलावरील रस्त्याचे काम तात्काळ झाल्याच पाहिजनिवेदन यावेळी उपस्थित  जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे, महानगराध्यक्ष बंटी बाबा सोनवणे, मनविसे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत, विभाग अध्यक्ष दिनेश कोळी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या