Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसां निमित्त जिलेबी वाटप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त जिलेबीचे वाटप  करण्यात आले.
माळेवाडी अकलूज येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या ज्येष्ठांच्या सार्वजनिक मोफत वाचनालयासमोर जिलबीचे वाटप बाळासाहेब फुले व  प्रा .रामलिंग सावळजकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नानासाहेब खंडागळे,  सचिन झेंडे गणेश वाटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी पत्रकार शकूर तांबोळी,  शशिकांत कडबाने, सोमनाथ खंडागळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, गणेश फुगे यांनी केले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या