Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक : जुना सुमठाणा येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहरातील सुमठाणा (जुना) येथील बेघर वस्तितील एका नराधमाने तेथील एका 14वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावुन तिच्यावर जबरीने अत्याचार केल्याची घटना शुक्रवार दि.13 जुनला दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेमुळे परीसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


      भद्रावती शहरा जवळील जुना सुमठाणा येथील सलिम मुल्का सय्यद (30) असे अत्याचारी आरोपीचे नाव असुन शुक्रवार दि. 13जुनला  दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास आरोपीने पिडितेच्या घरी जाऊन तुला माझ्या आईने तुला बोलाविले आहे. तिला अस खोट सांगुन आपल्या घरी नेले.

  सदर आरोपीने घराचा दरवाजा बंद करुन तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. पिडितेचे   वय 14 वर्षे आहे. सदर या घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. पिडत मुलीच्या सांगण्यावरुन आईने भद्रावती पोलीसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तपासा अंती आरोपीला त्याच्या घरी रात्रो 9 वाजता अटक केली. आरोपीस अनु क्र. 367/25,64 (आय) 65 (1),बि एन एस आर 46 पोस्को अंतरगत अनु जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या नुसार  जिल्हा न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम या करीत आहे. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या