Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती हुडकेश्वर रोड नागपूर यांनी या वर्षी *दिनांक 1 जून 2025 ला अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याकरिता कार्यक्रम आयोजित केला होता*.या कार्यक्रमा करिता मंचकावर *ना.मा.श्री नितीनजी गडकरी साहेब मंत्री सडक परिवहन व राज्य मार्ग भारत सरकार,माजी खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे साहेब,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीचे अध्यक्ष श्री मधुकरराव  काळमेघ,कार्याध्यक्ष डॉ.रमेशजी ढवळे साहेब, सचिव श्री महादेवराव पातोंड, साहेब उपस्थित होते*.सदर कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन मा.श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून अहिल्यादेवी यांच्या मूर्तीला हार पुष्प अर्पण व अभिवादन करून करण्यात आले.समितीच्या वतीने मा.श्री नितीनजी गडकरी साहेब तसेच डॉ. विकासजी महात्मे साहेब यांचा *सत्कार अहिल्यादेवी ची सुरेख अशी मूर्ती, घोंगडी व पुष्प व अहिल्यादेवीचा जीवन चरित्र गाथा देऊन करण्यात आला*.सचिव श्री महादेवराव पातोंड साहेब यांनी प्रास्ताविक करून समिती विषयीची माहिती प्रमुख पाहुणे व उपस्थित समाज बांधवांना दिली प्रास्ताविक करताना त्यांनी मा.श्री नितीनजी गडकरी साहेब यांना समाजाच्या काही अडचणी बाबत तसेच ज्या जागेवर हा कार्यक्रम होत आहे त्या जागेच्या प्रशासकीय अडचणी बाबत सांगितले व नंतर निवेदन  देवून सुद्धा अवगत केले. मा.गडकरी साहेब यांनी धनगर समाजाला संबोधित करताना तुमच्या या जागेची अडचण मी सोडवितो असा शब्द दिला पुढे बोलतांना ते म्हणाले की,सदर जागेवर होणाऱ्या अहिल्या भवनांमध्ये सामाजिक व शैक्षणिक कार्य करावे भवनाचा उपयोग हा मर्यादित कामापुरता न ठरता तो समाजहिताच्या दृष्टीने व्यापक असा असावा असे सांगितले. डॉ. महात्मे साहेबांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले शिका संघटित व्हा व संघर्ष करा त्याशिवाय समाजाला पर्याय नाही. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री हरीश खुजे साहेब यांनी केले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. दीपक कापडे व कु.विशाखा गावंडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री राम सोनाग्रे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री शरद उरकुडे, डॉ. विनोद बरडे ,अनिल तांबडे, राम लोही, विनोद भुजाडे,राजेश लोही ,विनोद अवझे, विपिन निखाडे, सतीश होपड,श्याम थोरात,राकेश पाल यांनी प्रयत्न केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये सौ संजीवनी घुरडे, वंदना बरडे,सरस्वता ताई पातोंड, अश्विनी उरकुडे,ज्योती कापडे, विद्या सोनाग्रे, कामिनी तवले, स्मिता तांबडे, स्वाती होपड ,मीनाक्षी लोही, विनिता पुनसे, रजनीताई काळमेघ,अनिता त्रिकुळ,सुधाताई अवझे,शीतल चामाटे,माधुरी माधुरी ढवळे शीला उरकुडे,वैशाली बीटे 
 इत्यादीनी भाग घेतला.*सौ वंदना विनोद बरडे यांनी कर्तुत्ववान अशा 11 महिलांचा अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.तसेच सौ.बरडे मॅडम  यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.गडकरी साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*. कार्यक्रमाची सांगता स्वरूची भोजनाने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या