चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 29 जून 2025 ला भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून भंडारा जिल्ह्यामध्ये प्रकल्प दिशा योजनेअंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते मुलांकरिता प्रकाश विद्यालय येथे तसेच मुलींकरिता अड्याळ विद्यालय अड्याळ येथे सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .यात एकूण 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा वेळेवर 11 वाजे सुरू करण्यात आली होती. यात अड्याळ येथील सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नियंत्रणात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 टिप्पण्या