Ticker

6/recent/ticker-posts

खबरदार....!अल्पवयीन पाल्यांना गाडी द्याल तर पालकांवर ही गुन्हा दाखल होणार !!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-आजकालचे कांही पालक मोठ्या रुबाबात स्वत:च्या अल्पवयीन पोरा- बाळांना गाडी चालवण्याला चावी देऊन प्रोत्सहान देतात.म्हणुनच हळी हंडरगुळी {ता.उदगीर} या गावातील गल्लीबोळात व मेन मार्केट,महामार्ग या ठिकाणी नादान असलेले तसेच ट्रॅफिक रुल्स माहित नसलेले शेकडो  लहान मुले धूम स्टाईल टू व्हिलर व ट्रॅक्टर चालवत असल्याचे आणि कशीही पार्क करत असल्याचे दिसते यामुळे अधून-मधून हलके-फुलके अपघात होताना दिसतात.म्हणुन या गावातील सामान्य जनता ना बालक असलेल्या चालकांवर व त्यांना थाटा माटात गाडी चालवायला देणा-या त्यांच्या पालकांवर ही कारवाई करावी,अशी मागणी करत आहेत. आजकाल कांही पालक स्वत:च्या अल्पवयीन पाल्यांना छोटे,मोठे वाहन चालविण्यासाठी चावी देऊन त्याच्या पाठीमागे बसलेले दिसतात. म्हणुन आता यापुढे अल्पवयीन मुला बाळांना गाडीची चावी देणा-या त्या पालकांवर ही पोलिस प्रशासनाद्वारे कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.तसेच दि.२० जुन रोजी कारवाई केल्याप्रमाणे पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती आहे.म्हणुन या पुढे अल्पवयीन चालकांसह त्यांना गाडी चालवायला देणे आता त्या पालकांच्या चांगलेच अंगलत येणार आहे.यामुळे पोरांना गाडी देणा-या पालकांवरही गुन्हे दाखल होणार आहेत.तेंव्हा मुलांचे भविष्य म्हत्वाचे का,गुन्हा ! हे पाहणे म्हत्वाचे आहे.
अलीकडच्या काळात लहान मुलांना शाळा,काॅलेज व अन्य कामांसाठी बाईक देण्याची फॅशनच आली आहे. ट्रॅफिक रुल्स माहित नाही.लायसंन्स नाही.धूम स्टाईल बाईक चालवितात, हे सर्व माहिती असूनही मुलांना चावी देऊन गाडी चालवायला प्रोत्सहान देणे म्हणजे त्या लेकरांचे नाव खाकी वर्दीवाल्यांच्या लिस्ट मध्ये ऐड करणे व मुलांचे फ्युचर बॅड करण्यासारखे आहे.७वी,८वी मधील कांही पोरं पण बाईक चालवित असल्याचे बघून या मुलांच्या जीवाची पर्वा त्यांच्या आई- बाबांना नाही,का?असा प्रश्न सामान्य हाळी-हंडरगुळीकरांना सतावतोय. कांही पोरं शानशौक म्हणुन बाईक चालवतात.माञ,स्वत:सह इतरांच्या जीवाची पर्वा त्यांना वाटत नाही.असे त्यांच्या गाडी चालवायच्या स्टाईल- कडे म्हटले जाते.व हा एक प्रकारचा अपराधच आहे.व याबद्दल कारवाई होऊ शकते,हे माहित असूनही कांही पालक पोरांना गाडी देतातच का? तेंव्हा योग्य त्या वयात गाडी देणे मुलांसह इतरांसाठी पण चांगले आहे केवळ बालहट्ट व शानशौक पुरवण्या करीता वाहन देणे बेकायदेशीर अन् पोरांच्या फ्युचरसाठी डेंजर आहे.
तेंव्हा सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे,पालकांनी आपल्या पाल्यांना कोणतीही गाडी देऊ नये,अत्यावश्यक ठिकाणी मुल गाडीवर बसवुन स्वत: पालकांनी ड्राईव्ह करावे,अन्यथा रितसर गुन्हे दाखल करण्यात येतील.असा स्पष्ट इषारा पोलिस प्रशासनाने दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या