वाढवणा पोलिसांची कामगिरी
'लयभारी'
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-अवैध धंदे करणारे कधी कोणती शक्कल लढवतील हे कांही सांगता येत नाही.अगदी असाच प्रकार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच उघडकीस आला असून,सध्या वाडी वस्ती मध्ये पण 'जार' मधील पाणी अनेकजण वापरु लागलेत.आणि या गोष्टीचाच फायदा डोंगरशेळकी ता.उदगीर येथील अवैध हातभट्टी दारु विक्री करणा-या महिलेने घेतला ! व परिसरात फिल्टर पाण्याच्या 'जार' मधून हातभट्टीची दारु वाहतूक व विक्री करत असताना वाढवणा बु. पोलिस ठाण्यातील जाॅंबाज सपोनि. सुनिल गायकवाड यांनी 'वाॅच' ठेवुन विश्वासू टीम सह 'रेड' करुन एका महिलेला अटक केली आहे.
या बाबत पोलिस सुञांकडून असे समजते की,उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथील एक महिला आरोपी नामे रेणुका संतोष पवार (३४ वर्षे,धंदा.मजुरी) स्वत:चे फायद्यासाठी हातभट्टीची दारु विक्री ही पाण्याच्या 'जार' मधून करत आहे अशी माहिती मिळाल्यावरुन सपोनि सुनिल गायकवाड यांनी सहकारी पोहेकाॅ.सर्वश्री संजय दळवे पाटील, एस.के.रंगवाळ, टी.टी.बळदे,संजय कलकत्ते,सुखा बोईनवाड व १ म.पो. या जाॅंबाज सहका-यांसह पाळत ठेऊन वरील नामे आरोपी महिलेच्या घरी 'रेड' केली असता,त्या घरात २० लिटरचे पाण्याचे २ जार तसेच १ लि. क्षमतेच्या प्लॅस्टीकच्या भरलेल्या ५ बाॅटल्स मिळून आल्या.त्या सर्वांत उग्र व आंबट वास असलेली दारु / हातभट्टी असल्याचे समजते.रेणूका संतोष पवार या आरोपी महिलेने ४५ लिटर दारु स्वत:च्या फायद्यासाठी व अवैधरित्या विक्रीसाठी घरी साठवून ठेवली होती.हे सिध्द होताच पो.ह. बळदे टी.टी.यांच्या फिर्यादीवरुन पो.स्टे.वाढवणा येथे आरोपी महिले विरुध्द गुरनं.१८८/२८ कलम ६५ (अ) (ई) म.दारु बंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
८ दिवसात ही दुसरी रेड केल्यामुळे सपोनि.सुनिल गायकवाड यांच्या देदणादण धडाकेबाज कामगिरीची दहशत अवैध धंदेवाल्यांमध्ये बसली आहे.
हातभट्टी करणार तडीपार .....
विशेष पोलिस महानिरिक्षक शहाजी उमाप,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्दे हद्दपार करण्याची मोहिम सुरु केली असून त्यासाठी विविध पथके कार्यान्वित केले आहेत तसेच यांच्याच मार्गदर्शनाखाली या परिसरातील हातभट्टी दारु तडीपार करणारच ! असे आमच्या जवळ बोलताना सपोनि.सुनिल गायकवाड यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या