Ticker

6/recent/ticker-posts

सुनिल सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप!

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : सहाय्यक कृषी अधिकारी सुनिल सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहाणा बर्डीपाडा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या,पेन,पेन्सिल, खोडरबर, शापनर व ग्रंथालयीन पूस्तके वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापुन किंवा आलीशान ठिकाणी वाढदिवस साजरा न करता प्रत्यक्षात  मोजे - शहाणा बर्डीपाडा येथे जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या आदिवासी  समाजाच्या लहान मुलांना  शैक्षणिक साहित्य  वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.शैक्षणिक साहित्य हातात घेतांना चिमुकले यांचा हसरा आंनदीत चेहरा बघुन समाधान वाटले. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा वाचनालय श्रीखेड यांना कृषि विषयक ,समाजिक , शैक्षणिक ,आरोग्य विषयक पुस्तके भेट देण्यात आले.
                        या कार्यक्रमाला  सुशिलकुमार पावरा  राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स , डाँ.भगवान खेडकर वैधकिय अधिकारी वाघर्डे  ,सुरजित ठाकरे सामाजिक कार्यकर्ता फतेपुर ,गोपाल भंडारी राज्याध्यक्ष  बिरसा फायटर्स महाराष्ट्र, संतोष वळवी सहाय्यक कृषि अधिकारी पाडळदा,अनिल चव्हाण जिल्हाअध्यक्ष आदिवासी एकता परिषद नंदुरबार,बजरंग भंडारी औषध निर्माण अधिकारी शहाणा,रविद्र ठाकरे अध्यक्ष आदिवासी टायगर सेना महाराष्ट्र,नरेद्र भंडारी, चैञाम पटेल समाजिक कार्यकर्ता आमझिरी,पप्पु पवार आदि कार्यकर्ते कृषी विभागातील कर्मचारी ,अधिकारी व विद्यार्थी , सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सुनिल सुळे सहाय्यक कृषि अधिकारी,शहाणा,राष्ट्रीय कार्याध्यक्ष सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र,  अध्यक्ष आँल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन नंदुरबार, संस्थापक/अध्यक्ष क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशिय संस्था शहादा  जिल्हा नंदूरबार अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यास समाजमाध्यमातून सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या