Ticker

6/recent/ticker-posts

ईव्हीएम हटाव या प्रमुख मागणीसाठी सोलापूरमध्ये भव्य मोर्चा; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर  : 23 जून 2025 रोजी सोलापूर येथे ईव्हीएम हटाव या प्रमुख मागणीसाठीवंचित बहुजन आघाडीकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे करणार आहेत.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मारकडवाडी येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मारकडवाडीचे सरपंच रंजीत मरकड, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, तसेच जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण उपस्थित होते.

बैठकीमध्ये मोर्चाच्या नियोजनासह सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग कसा सुनिश्चित करता येईल, यावर चर्चा झाली. ईव्हीएम हटाव ही मागणी लोकशाहीच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या