Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी येथे बर्थ डे च्या नावाखाली दिवसभर एकच प्याला आणि मग मध्यराञी पर्यंत रस्त्यावर धुडगूस घाला..!प्रशासन बघे!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-ज्यांच्या आई-बापांनी कधी स्व:ताचा बर्थ डे साजरा केला नाही.त्या आई- बापांचे कांही चिरंजीव स्व:ताचा बर्थ डे साजरा करण्याच्या नावाखाली ईष्टमिञांना दिवसा *एकच प्याला* देतात.आणि मध्यराञी पर्यंत धांगड- धिंगाणा करताना हाळी-हंडरगुळीत बहूतांश गल्लीत,चौकात,राज्यमार्गा- वर जनतेला दिसते.तसेच या सर्वच *टग्याच्या* धिंगाण्याचा ञास सहन करत आमआदमी राञ काढतात.हा सर्व प्रकार घडण्याला कारणीभुत आहे प्रशासन !
कारण,सार्वजनिक रस्त्यावर,पल्बिक प्सेस,मंदीर,दवाखाना व इतर जागेत डि.जे.वाजविणे,धिंगाणा करणे हा कायद्याने गुन्हा असलातरीही येथे आजवर एकही गुन्हा नोंद करण्याची *डेअरींग*कुणीच केली नाही.म्हणुन बर्थ डे सारख्या चांगल्या कार्याला विक्रत व इतरांना ञास कसा होईल, असे स्वरुप आल्याचे चिञ दररोज हाळी-हंडरगुळीकर बघतात.तसेच प्रशासन पण बघते.तरीही डेअरींग नसल्याने कारवाही करत नसल्याने दिवसा एकच प्याला आणि राञभर धिंगाणा घाला.असा प्रकार रोजचाच झाला आहे.आणि याला कोणीतरी आवरा हो..अशी मागणी ञस्त जनते मधून होत आहे.
आप्तेष्टांसह ईष्टमिञांना बोलावून घरच्याघरी साजरा करायचा उत्सव म्हणजे 'वाढदिवस'
पण,आजकाल वाढदिवस जरा हटके पध्दतीने म्हणजे दिवसभर खाणपान करायचे आणि मध्यराञी सार्वजनिक ठिकाणी केक कापायचा आणि तो खाण्याचा ऐवजी थोबाडा वर लावायचा आणि एकच धिंगाणा घालायचा.असा प्रकार ज्यांनी कधी स्व:ताचा वाढदिवस साजरा केलेला नाही.अशा पालकांचे पोरं करताना रोज दिसून येतात.आणि यावेळी आरडा,ओरडा ही न चुकता करतात. 
*बाईक आणि कारचा वापर* हा केक कापण्यासाठी करतात.म्हणुन आजकाल साजरा होणारा बर्थ डे हा सार्वजनिक शांतता भंग करणारा डे बनला असून बाईक व कारवर ठेवुन केक कापतात.आणि तो खाण्यापेक्षा एकमेकांच्या चेह-यावरच लावतात. आणि मग फटाक्यांसह शिट्ट्यांची आतिषबाजी,जोरजोरात धिंगाणा हा प्रकार नित्याचाच झाला आहे.आणि या बाबत कुणी समजावायचा प्रयत्न केला,तर त्यालाच ते टोळके,टगे पोरं अरेरावी करतात.म्हणुन या टग्यांचा मुकाट्याने ञास सहन करत बिच्चारी आम जनता कशीबशी दिवस-राञ काढीत असते.आणि विशेष म्हणजे डी.जे.सह हा सर्व गोंधळ माहिती असूनही प्रशासन ढीमच आहे.तेंव्हा असे गैरप्रकार करणा-या व सामान्य जनतेला हकनाक ञास देणा-या टग्यांवर कारवाई करायची डेअरींग कोण व कधी दाखविणार?याकडे हाळी-हंडरगुळीकरांचे लक्ष लागलेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या