Ticker

6/recent/ticker-posts

मान्सून रिलीज कधी होणार..हंडरगुळी परिसरातील शेतक-यांच्या लागल्या नजरा...

———————————————


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-११ ते २८ मे दरम्यान अवकाळी पाऊस धो,धो बरसला.पण जुन सुरु झाला तरीही अजुन ख-याखु-या पावसाला सुरुवात झाली नसल्याने हंडरगुळी सह परिसरातील शेतकरी बांधवांसह आमआदमीच्या नजरा मान्सूनच्या रिलीज होण्याकडे म्हंजे आगमनाकडे लागलेल्या आहेत.
यंदाचा उन्हाळा ४ ऐवजी ३ साडेतीन महिनाच जानवला.कारण,उन्हाचा अत्यंत खडतर महिना म्हणुन प्रसिध्द असलेल्या मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाच्या चटक्याऐवजी विजांचा कडकडाट तसेच ढगांचा गडगडाटा- सह अवकाळी पावसाने हंडरगुळी व परिसराला धो,धो धुतल्यामुळे सर्वञ हाहा:कार माजला होता.तसेच सर्वञ जनजिवन विस्कळीत झाले होते.तर पेरणीपुर्व शेतीकामे खोळंबले होते. पण आता जुन महिना म्हणजे खरा पावसाळा सुरु होण्याचा मोसम सुरु झाला असलातरीही अद्याप पर्यंत पाऊस पडलेला नसल्यामुळे हाळी, हंडरगुळी,मोरतळवाडी,अढळवाडी, चिमाचीवाडी,रुद्रवाडी,चिद्रेवाडी, वंजरवाडी,गादेवाडी,नागदरवाडी, सुकणी,वडगाव,शेळगाव,वायगाव, टाकळगाव येथील शेतकरीबांधव व आमआदमी मोसमी पावसाची चातक पक्षासारखे वाट पाहत आहेत      *पेरणीसाठी लवाजमा तयार*
मे महिन्यात धुआॅंधार अवकाळी पाऊस पडत होता.तेंव्हा यंदा म्रग नक्षञातच पेरण्यांना सुरुवात होईल, अशी आशा जनतेसह शेतक-यांना वाटत होती.आणि याच आशेवर या भागातील शेतक-यांनी पेरणीसाठी आवश्यक असलेला लवाजमा म्हंजे खते,बि-बियाणे  जमा करुन ठेवले असून आता सगळेजण मान्सून रिलीज कधी होणार?याकडे नजरा लावून बसले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या