Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक सिकलसेल दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-सिकलसेल आजार हा अनुवंशिक आजार आहे,  सिकलसेल हा लाल रक्तपेशीशी संबंधित आजार आहे सिकलसेल रक्तपेशी ह्या विड्याच्या आकाराचे व ताठर असतात त्यामुळे त्या रक्तवाहिनीतून सहज वाहून जाऊ शकत नाही त्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिटकून बसतात, त्यामुळे शरीरातील इतर अवयवापर्यंत ऑक्सीजन पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. डॉक्टर प्रमोद पोद्दार सर वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आडे मॅडम, डॉक्टर जैन मॅडम, आशिष पाटील वैज्ञानिक अधिकारी सिकलसेल यांनी सिकलसेल  बद्दल इत्यंभूत माहिती दिली कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील श्री श्रीकांत गोहाड सर श्री विनय शेलुरे, श्री सुजित वानखडे श्री रितेश कुकडे, मीनाक्षी वगैरे, सुमन जावरकर अधि परिचारिका, विशाखा ब्राह्मणे, स्वाती बुरंगे ,सुवर्णा श्रीराव ,वृषाली भगत, गौरव  हरले, आनंद बुले, तेजस्विनी डाफे, कांचन राऊत ,कविता इंगोले , अमोल झाडे,भीमरावजी चव्हाण, मदिहा कौसर, नागोरावजी खडसे, राजू दामले, प्रकाश पांडे, तसेच कार्यक्रमाला रुग्ण व अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने हजर होते


ही आहे लक्षणे
" सिकलसेल रोगांना रक्ताची कमतरता होणे, खूप वेदना होणे, डोळे व शरीर पिवळसर पडणे, मेहनतीचे काम केल्यास किंवा चालल्यास श्वास भरून येणे, लहान मुलांना वारंवार जंतुसंसर्ग होणे यासारखी लक्षणे दिसून येतात". 

" लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी अवश्य करावी योग्य उपचार व योग्य आहार घेतल्यास आजाराची तीव्रता कमी होऊन ते  चांगले आयुष्य जगू शकतात*"
डॉक्टर प्रमोद पोतदार 
वैद्यकीय अधीक्षक ,उपजिल्हा रुग्णालय मोर्शी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या