Ticker

6/recent/ticker-posts

शिवशंकर बझारमध्ये शालेय साहित्य दालनाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा समृद्ध करण्याचा संस्थेचा उपक्रम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज : येथील शिवशंकर मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या शिवशंकर बझार च्या मुख्य शाखेत शालेय साहित्य दालनाचे उद्घाटन  उत्साहात पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सुलभ आणि वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. तसेच शालेय स्टेशनरी वर दहा ते पंधरा टक्के पर्यंतचे सूट देण्यात येणार आहे.

 उद्घाटन प्रसंगी संथेच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग निर्मिती या चित्रपटाच्या प्रमुख कलाकार अश्‍विनी महांगडे, लेखक दिग्दर्शक सुशांत सोनवले, निर्माते सोमनाथ शिंदे, कार्यकारी निर्माता दादा शिंदे, सलमान मुलाणी, प्रताप थोरात, धीरज पवार, निशा शिंदे, धैर्या एकतपुरे, प्रदिप महांगडे, संस्थेचे व्हा.चेअरमन मदन भगत, संचालक  ॲड.नितीन खराडे, नारायण फुले,  सिन्नाप्पा वाघमोडे, अर्जुन भगत, कैलास ताटे, शिवकिर्ती महिला औद्योगिक संस्थेच्या शैलेजा गुजर, श्रीमती रंजना आसबे, वैशाली कुलकर्णी, व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांनी शालेय साहित्य दालनाचे उद्घाटन करून दालनाची पाहणी केली. उपस्थितांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेचे कौतुक केले. या शालेय साहित्य दालनात विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य - वह्या, पुस्तकं, कंपास पेट्या, पेन-पेन्सिली, ड्रॉइंग साहित्य, गणिती साधने, स्कूल बॅग्स आणि इतर शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे साहित्य अत्यंत वाजवी दरात व सवलतीसह देण्याची योजना राबवण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील म्हणाल्या,  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज मिळावे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सालाबाद प्रमाणे हे दालन सुरू केले आहे. पालकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य खरेदीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या दालनामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर आणि योग्य दरात साहित्य उपलब्ध होणार असल्याने शैक्षणिक सुरुवात अधिक सुसंगत व सुलभ होईल, असा विश्वास पालक आणि शिक्षक वर्गाने व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक गोपाळराव माने देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक मंडळातील सदस्यांनी केले. शिवशंकर बझारमधील शालेय साहित्य दालन हा उपक्रम भविष्यात आणखी विस्तारित करून इतर शैक्षणिक सुविधा देण्याचा संस्थेचा मानस असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या