Ticker

6/recent/ticker-posts

वनपट्टेधारक शेतक-यांना फाॅर्मर आयडी मिळावी: बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-वनपट्टे धारकांना फाॅर्मर आयडी मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जगदीश डुडवे,आकाश तडवी,सत्तरसिंग तडवी, किरण जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                      नंदुरबार जिल्ह्य़ातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा मिळणे अत्यावश्यक आहे.कारण सातबाराशिवाय पिक विमा योजना,ई पिक नोंदणी योजना इत्यादीची योजनांचा लाभ घेता येत नाहीत. जिल्ह्य़ातील ब-याच वनपट्टा धारक शेतक-यांचे  फार्मर आयडी  तयार झाले नाहीत. नवीन नियमानुसार महा डिबीटी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना  भेटतात त्या आता फार्मर आयडी शिवाय भेटणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे .तसेच ते लागू सुद्धा झाले आहेत. फार्मर आयडी नेच आता महा डिलीटी च्या पोर्टल वर लॉगिन होत आहे . म्हणून जिल्ह्य़ातील वनपट्टाधारक शेतकरी या योजने पासून तसेच पिक विमा,  ई पिक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत. म्हणून जिल्ह्य़ातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळावेत व फाॅर्मर आयडी बनवून मिळावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या