Ticker

6/recent/ticker-posts

माझा उद्योग, माझा व्यवसाय – उद्योजक विकास कार्यशाळा मुंबईत!

चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राद्वारे दिनांक 28 जून ते 2 जुलै 2025 दरम्यान "उद्योजक विकास कार्यशाळा" आयोजित केली जात आहे. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आर्थिकदृष्ट्या सबळ आणि सधन समाज उभारणे आहे.

या कार्यशाळेचे आयोजन अध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रेरणेने झाले असून, समन्वयक म्हणून सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यशाळेत बौद्ध व अनुसूचित जाती/जमातीतील तरुणांना उद्योजकतेच्या मार्गावर आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यासाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी युवकांना व्यवसायाची दिशा ठरवणे आणि ती विकसित करण्यापासून ते मार्केट रिसर्च व स्पर्धात्मक रणनीती आखण्यापर्यंत मार्गदर्शन मिळेल. प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅन कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिकात्मक प्रशिक्षणही दिले जाईल. याशिवाय, भांडवल मिळविणे, बँक कर्ज व सरकारी योजना कशा उपयोगात आणायच्या, GST, MSME आणि UDYAM नोंदणी प्रक्रियेची माहिती तसेच सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंगचे तंत्र शिकवले जाईल. ग्राहक सेवा, ब्रँड बिल्डिंग व विक्री कौशल्य यावरही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी उपस्थितीत होणार आहे, ज्यामुळे सहभागी युवकांसाठी हा अनुभव अत्यंत उत्साहवर्धक आणि मार्गदर्शक ठरेल. प्रशासनिक अधिकारी पदासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, ज्यामुळे त्यांना स्वतःला प्रेरणा मिळेल आणि त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवी उमेद मिळवू शकेल.

सांस्कृतिक केंद्राच्या ‘उद्योजक विकास विभागा’ने आतापर्यंत दोन यशस्वी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, ज्यातून ९५ युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून आर्थिक यशस्वीतेचा प्रवास सुरू केला आहे. कार्यशाळेदरम्यान सहभागींसाठी चहापाणी व भोजनाची व्यवस्था असेल. कार्यशाळेसाठी शुल्क अत्यंत सवलतीच्या दरात आकारण्यात येणार आहे. कार्यशाळा ५ दिवसांची असणार असून, उद्योजकतेची इच्छा असलेल्या युवकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक आयुष्यमान चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे. नोंदणीसाठी लाभार्थींनी दिनांक २५ जून २०२५ पर्यंत प्रत्यक्ष केंद्रात येऊन नोंदणी करावी.

चला, छोट्या कल्पनेतून बलाढ्य व्यवसाय निर्माण करूया आणि आपली आर्थिक महासत्ता प्रस्थापित करूया! संधी तुमच्या समोर आहे, तिचे सोने करायचे हे तुमच्या हातात आहे!

नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी सहभागीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, आर.टी.ओ कॉर्नर, चार बंगला, अंधेरी (प), मुंबई - 400053 येथे संपर्क साधावा.फोन: 9137965218 | 8305535352 | 9324480545.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या