बैठकीत संघटनात्मक बांधणी, युवकांमध्ये जनजागृती, आगामी निवडणूक धोरण आणि स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना यावर सखोल चर्चा
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर – वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर, माढा व उस्मानाबाद शहर जिल्हा कमिटीची नियोजन बैठक आज मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय दिशा व कार्यपद्धतीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नितीन ढेपे (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य) उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्रा. सोमनाथ साळुंके (महाराष्ट्र कार्यकारणी उपाध्यक्ष तथा सोलापूर निरीक्षक), अमोलभैया लांडगे (युवा निरीक्षक – सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद), सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखंबे, माढा जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत संघटनात्मक बांधणी, युवकांमध्ये जनजागृती, आगामी निवडणूक धोरण आणि स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पारसे यांचे नुकतेच झालेल्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या बैठकीमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या