चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-उप जिल्हा रुग्णालय मोर्शी वैद्यकीय अधिक्षक माननिय डॉ. प्रमोद पोतदार सर यांचे मार्गदर्शनाखाली व खुले कारागृह अधीक्षक माननिय श्री. आर. व्ही. रावे सर व डाॅ. श्री. राॅय सर श्री. खोब्रागडे, श्री. सतीश मुंजळे यांचे सहकार्याने सिकलसेल आजार व एचआयव्ही एड्स कार्यक्रम बाबत बंदीजनांमध्ये जनजागृती व रक्त तपासणी शिबीर संपन्न करण्यात आले.
उप जिल्हा रुग्णालय मोर्शी येथून श्री. आशिष पाटील प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी सिकलसेल आजार अनुवांशीक असून यात दोन प्रकार आहेत तसेच सिकलसेल रक्तातील लाल पेशींशी सबंधित आहे याबद्दल माहिती दिली . सामान्य लाल पेशी वाटोळ्या (गोल) आकाराच्या असतात. तर सिकलसेल लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या असतात त्यामुळेच त्या रक्तात शरीरातील सर्व अवयवापर्यंत पोहचण्यास असमर्थ ठरतात, निष्क्रिय होतात. परिणामी सिकलसेल रूग्ण (ग्रस्त) असणाऱ्या व्यक्तीला अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतूसंसर्ग होणे या सारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच तुलनेने सिकलसेल वाहक व्यक्ती सामान्य जिवण जगु शकतात. याबाबत माहिती दिली. सिकलसेल अनुवांशीक असल्याने लग्न ठरण्यापुर्वी मुलगा व मुलगी दोघांचीही रक्त चाचणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये दोघेही वाहक असतील तर.. , एक वाहक व एक ग्रस्त असेल तर.... किंवा दोघेही ग्रस्त असतील तर असे विवाह टाळणे आवश्यक आहे याबाबत माहिती दिली.
एचआयव्ही एड्स बाबत श्री. श्रीकांत गोहाड एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र समुपदेशक उप जिल्हा रुग्णालय मोर्शी यांनी बंदीजनांमध्ये जनजागृती केली. श्री. गौरव हरले (एच. एल. एल.), कु. सृष्टी राजगुरे व मदीया खान यांनी रक्त संकलन केले.
0 टिप्पण्या