Ticker

6/recent/ticker-posts

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना (ऑल इंडिया कार्यरत)




चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :-देशभरातील सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अग्रस्थानी असलेल्या तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नेतृत्वात एक महत्वाची आणि गौरवशाली भर पडली आहे.

संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदीपभाऊ गवई यांच्या आदेशानुसार, तसेच राष्ट्रीय कार्यकारी कार्याध्यक्ष मा. कुणालभाऊ माने यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली, मुंबई मानखुर्द येथील समाजासाठी झटणारे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते मा. विनोदभाऊ नरवाडे यांची "राष्ट्रीय कार्यकारी सचिव" या अत्यंत जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्य तसेच देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण करणारा आहे. मा. विनोदभाऊ नरवाडे हे अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय, बहुजन हक्क, बुद्ध विचार आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न घेऊन सातत्याने कार्यरत आहेत. संघटनेच्या उद्दिष्टांशी निष्ठावान राहून त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये आपले कार्य सिध्द केले आहे.

त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्यात नवे बळ मिळेल आणि तथागत विचारसरणीला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावी पद्धतीने कार्य होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

या गौरवप्राप्त पदावर निवड झाल्याबद्दल मा. विनोदभाऊ नरवाडे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे आणि त्यांच्या पुढील सामाजिक, संघटनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या