मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र मो 9860179256
धाराशिव: - अणदूर तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत एसटी स्टँड ते खंडोबा मंदिरापर्यंत झालेल्या दोन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
या रस्त्यावर अवघ्या काही दिवसातच भेगा (चिर) पडल्या असून या प्रकाराची उच्चस्तरीय राज्य गुणवत्ता निरक्षकाकडून चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदरचा होत असलेला रस्ता हा पर्यटन विकास योजनेअंतर्गत बस स्टँड ते खंडोबा देवस्थान पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर खूप रहदारी शाळेचे विद्यार्थी आणि भक्त लोक ये जा करतात हा रस्ता मेन रस्ता आहे या रस्त्यासाठी दोन कोटी मंजूर झाल्याने गावातील कर्त्या लोकांना खूप आनंद झाला होता पण हा रस्ता अत्यंत निकृष्ट होत असल्याने याची उच्चस्तरीय गुणवत्ता निरीक्षकाकडून चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख आरोप
1 रस्ता कामात दोन महिन्याच्या त रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा (चिरा) पडल्या आहेत.
2 रस्ता कामासाठी धुळीचा (डस्ट) अति प्रमाणात वापर केल्याने कामाचा दर्जा खालावला आहे.
3 रस्ता काम चालू होण्यापूर्वी रस्त्यावर रोलर फिरवली नाही.
4 रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी जास्त ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5 या निकृष्ट कामामुळे शासनाचे दोन कोटी रुपये निधी वाया जात आहे.
0 टिप्पण्या