संशयीत आरोपी अंकित पटेल वर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; १०० पेक्षा अधिक जणांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : १२ जून २०२५ रोजी शहादा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आदिवासी आंदोलन कर्त्यांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या एका कार्यकर्त्याने "टवाळखोर" असा शब्द वापरून अपमानित केल्याविरोधात संशयीत आरोपी अंकित रामाभाई पटेल राहणार तालुका शहादा जिल्हा नंदूरबार याच्याविरुद्ध ॲस्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा,अशी लेखी फिर्याद १०० पेक्षा अधिक आदिवासी आंदोलन कर्त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,भारतीय स्वाभीमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत,विधितज्ञ राहूल कुवर,सुरेश पवार, किशोर ठाकरे,कैलास पवार, हर्षल पावरा,अरूण पावरा, मधूकर पावरा,अप्पा सुळे ,वानसिंग पवार, नितेश जाधव, दिपक तडवी, अशोक भंडारी, वासुदेव पवार, पवनसिंग पवार, गोविंद डूडवे, दिनकर सुळे, दिलीप जाधव आदि १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी समाजाच्या शेतजमिनी ह्या मोठ्या प्रमाणात चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी याने हडप केल्या विरोधात विविध आदिवासी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी याने शहादा येथील सभेत आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक शब्द प्रयोग करून जाहीररित्या अपमानित केल्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून देखील कोणतीही कायदेशीर कारवाई झालीच नाही म्हणून चंद्रकांत रघुवंशी याचा शहादा येथील कार्यकर्ता आरोपी अंकित रामाभाई पटेल याने दिनांक १२ जून २०२५ रोजी शहादा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या विविध आदिवासी संघटना व सामाजिक युवकांना टवाळखोर म्हणणारे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना पाठवून जाहीर रित्या पुन्हा आदिवासी समाजाला जाणूनबुजून हेतुपुरस्सर रित्या अपमानित करणारे पत्र दिलेले आहे.सदरचे पत्र हे आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचारांविरोधात सदैव लढणारे राहूल श्रीराम कुवर यांना प्राप्त झाले आहे.
१२ जून २०२५ रोजीचा शहादा बंद यशस्वी झाल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आदिवासी आंदोलन कर्त्यांना टवाळखोर ,समाजबाह्य,गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेले युवक असे शब्द वापरून अपमानित करून डिवचण्याचे,भडकावण्याचे काम करणा-या अंकित रामाभाई पटेल याचा आम्ही जाहीर याचा जाहीर निषेध व्यक्त करतो.आमचे वकील राहूल कुवर हे आदिवासी समाजाच्या जमिनी परत मिळाव्यात,आदिवासींच्या हक्क व अधिकारासाठी लढत आहेत, म्हणून त्यांच्याविरोधातली तक्रार सुद्धा आम्ही सहन करणार नाहीत.आम्ही सर्व आदिवासी संघटना राहूल कुवर सोबत खंबीर पणे उभे आहोत. जो कोण तक्रार दार आहे,त्याने लपून छपून तक्रार करू नये,आमच्यासमोर येवून तक्रार करावी,तो उंदराच्या बिळात जरी लपून बसला असला तरी आम्ही त्याला शोधून काढू,पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही आमच्या आदिवासी स्टाईल ने त्याचा बंदोबस्त करू,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या