Ticker

6/recent/ticker-posts

अनुसुचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड धर्मपाल मेश्राम यांनी चोरा येथील पीडीत व्यकी रंणदीप आसुटकर यांच्या घरी दिली भेट


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : मा.अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अँड धर्मपाल मेश्राम यांनी नियोजित दौरा कार्यक्रम नुसार, भद्रावती तालुक्यातील चोरा येथील पीडित व्यक्ती रंणदीप आसुटकर यांच्या घरी जाऊन भेट दिली
काही दिवसांपूर्वी आसुटकर यांच्या 14वर्ष मुलीची ९आरोपीनी बलात्कार करून खून करून विहीरीत फेकून दिले होते.
पोलिस प्रशासन यांनी एकाला पास्को अतंर्गत गुन्हा दाखल केला,मात्र सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना अटक केली नाही
केस मागे घ्या अन्यथा मुलाला सुद्धा संपवू अशी धमकी देत होते व आजही देत आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे  वरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन शासन प्रशासन यांना गंभीर तक्रार केली व आरोपीला जामीन देऊ नका म्हणून कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वरोरा यांच्या न्यायालयात आक्षेप अर्ज लिहून दिला,व खुद्द रणदीप आसुटकर यांनी न्यायालयात दाखल केला.
 तक्रारीची दखल घेऊन आज माननीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष श्री.अड.धर्मपाल मेश्राम साहेब यांनी प्रत्यक्ष चोरा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली,व न्याय देन्यासाठी निर्देश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या