चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- शहादा तालुक्यातील वडगांव- चिंचपाणी येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम लोकांच्या वस्तीजवळ व्हावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे दिनांक २७ मे २०२५ रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथे अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात आली आहे.परंतू अंगणवाडी इमारत बांधकामाचे उद्घाटन हे लोकांच्या वस्तीपासून तब्बल २ किलोमीटर अंतरावर करण्यात आले आहे.अंगणवाडी पर्यंत लहान बालकांना २ किलोमीटर अंतरावर पायपीट करीत जावे लागते.रस्त्याचीही सोय नाही.पावसाळ्यात खूप अडचणी निर्माण होतात. म्हणून शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील अंगणवाडी इमारत बांधकाम हे लोकांच्या वस्तीजवळ करण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार कडे करण्यात आली होती.
बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हसावद तालुका शहादा यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार ग्रामपंचायत वडगांव मधील चिंचपाणी हा पाडा कोळपांढरी येथील अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत असून कोळपांढरी या गावासाठी सन २०२२-२०२३ ते सन २०२३-२०२४ या दोन वर्षांत जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्याही योजनेत सदर गावासाठी किंवा पाडासाठी अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात आलेली नाही.तसेच चिंचपाणी येथे सर्वे करून नवीन मिनी अंगणवाडी केंद्र मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करणेचे कार्यवाही करणेत येत आहे म्हणून कळवले आहे. अशा आशयाचे पत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांनी दिनांक ३० मे २०२५ रोजी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना ईमेल द्वारे पाठवले आहेत.त्यामुळे चिंचपाणी पाडात लहान बालकांसाठी नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू होणार आहे,म्हणून गांवक-यांनी बिरसा फायटर्सचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या