चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :-गडचिरोलीतील मुस्लीम नेते व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले स्व. रफिकभाई शेख यांचे काल दिनांक ३ जून रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
या दुःखद प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्व. रफिकभाई शेख यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शेख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, लतीफभाई शेख, इकबाल शेख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलीम शेख, इस्राईल शेख, अमीर अली नाथानी, सय्यद समीर, तसेच अनेक स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या