Ticker

6/recent/ticker-posts

त्या' आरोपीचे निलंबन नाही, तर सीडीसीसी बँकेतून कायमचे बडतर्फ़ करा....

पीड़ित तरुणीचे सीईओ च्या आदेशाला दिले आवाहन 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : तालुक्यात चंदनखेडा येथील आशीष बारतिने याचे विरुद्ध लग्नाचे आमिष व शारीरिक शोषण केल्याचे बाबतीत आरोपीवर दाखल कलम ३७६(२) एन, ४१७  गुन्हयानुसार त्यास अटक होवून चंद्रपुर कारागृहात् रवानगी झाली होती.  सीडीसीसी बैंक अध्यक्ष सीईओ व संबधित वरिष्ठ अधिकारी  याना लेखी तक्रार केली असता हि बाब गंभीर स्वरूपाची असल्याने त्यास   बँकेचे मानव संसाधन धोरननुसार दि २ जुनचे आदेशान्वये बँकेचे  सेवेतून् निलंबित केले आहे, तसेच विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे, 
 सदर आरोपी हा मुधोली बैंक शाखेत नवनियुकत कर्मचारी असून तो शिपाई पदावर् नियुक्त आहे, दि ४ एप्रिलला आरोपी आशीष बारतिने याचे विरुद्ध लग्नाचे आमिष व शारीरिक लैंगिक शोषण केल्याचे बाबतीत पीड़ित तरुणीने भद्रावती पोलिस ठाण्यात आशीष बारतिने याचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६(२) एन, ४१७ नुसार गुन्हा दाखल असून  आरोपीला चंद्रपुर कारागृहात् रवानगी सुद्धा झाली होती.  बलात्कारित आरोपीला मुधोली बैंकच्या पदावरून कायमचे बडतर्फ करावे,अशी मागणी पीड़ित युवतीने बैंकचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, मुख्य  कार्यकारी अधिकारी कल्याणकर  ज़िल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तसेच  आयुक्त सहकार व निबंधक सहकारी संस्था ,सहकार मंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी  केली होती. याची बातमी महासागर वृत्तपत्रात  प्रकशित होताच  राजेश्वर कल्यानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  दखल घेत दी २ जून २०२५ ला  बँकेचे मानव संसाधन धोरण HRD सेवानियम कायदा व तरतूदी नुसार त्या बलात्कारित आरोपीला बैंकच्या सेवेतून निलंबन करण्याचे आदेश पारित करून विभागीय चोकशीचा निर्णय घेतला आहे.

सदर कारवाई बाबत पीड़ित युवती व पालक समाधानी नसून सेवेतुन् कायमचे बडतर्फ़ करण्याची ठाम भूमिका घेऊन  संघर्षरत आहे, 
----------------------------------------
----------------------------------------
 पीड़ित तरुणी- 
'त्या ' बलात्कारित आरोपीला बँकेचे साहेबांनी निलंबित करुण विभागीय चौकशीचा निर्णय घेतला असला तरी आरोपीला पदावरून  कायमचे डिसमिस होइपर्यंत हा लढा असाच सुरु राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या