Ticker

6/recent/ticker-posts

संतापजनक घटना --- डॉक्टरांच्या चुकीच्या निर्णयामुळे स्नेहल गायकवाड यांचा मृत्यू


 मग चंद्रपूर वरून डॉक्टरांना आणण्यासाठी या गाडीचा वापर कुठल्या नियमात? गावाकऱ्यांचा संताप.




चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : तालुक्यातील मुधोली या गावातील सरकारी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर प्रकार घडला असून स्नेहल उत्तम गायकवाड वय 28 वर्ष याला डॉ मेश्राम यांनी प्राथमिक उपचार न करता व येथील सरकारी ऍम्ब्युलन्स असतांना व ड्राइव्हर असतांना त्याला पुढील उपचारासाठी खाजगी गाडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यास सांगतिले असता खाजगी ऑटो गाडीत नेण्यात आल्यानंतर रुग्णालयाच्या दारात त्याचा मृत्यू झाला सरकरी आरोग्य व्यवस्थापन आता जणु व्हेन्टिलेटरवर आहे कि काय आसा प्रकार सध्या चंद्रपूर जिल्ह्यात चालु आहे. आरोग्य विभागाचे डॉक्टर आणी कर्मचारी यांच्या मुजोऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे जनतेत संतापाची लाट पसरत आहे. डॉक्टर मेश्राम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुधोली येथील गावकऱ्यांनी केली आहें.

मिळालेल्या माहिती नुसार स्नेहल उत्तम गायकवाड हा खांबाडा तालुका चिमूर येथे पोस्टमन पदावर कार्यरत होता, तो मुधोली तेथे आला असता त्याच्या छातीत दुःखत असल्याने त्याचा मित्र मयूर धारणे यानी त्याला मुधोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉ. मेश्राम यानी त्याला बघितले व पुढील उपचारासाठी याला चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले मात्र या आरोग्य केंद्राला गाडी आहें व ड्राइव्हर सुद्धा आहें तरीही डॉ. मेश्राम यानी ती गाडी न देता खाजगी गाडीने घेऊन जा असे सांगितल्याने शेवटी ऑटो गाडीत टाकून रुग्णाला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता दारातच त्यानी प्राण सोडले व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

डॉक्टरांना गाडी येण्याजाण्यासाठी मग रुग्णांना का नाही? असा संतप्त सवाल गावकरी करीत आहे. मुधोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जी सरकारी गाडी आहें ती गाडी दररोज चंद्रपूर वरून डॉक्टरांना येण्याजाण्यासाठी वापरण्यात येत आहें, पण दुर्गम भागात असलेल्या मुधोली मध्ये खाजगी गाड्या वेळेवर मिळतं नसताना व सरकारी गाडी आरोग्य केंद्रात असतांना रुग्णांना मिळतं नसेल तर ही गाडी काय डॉक्टरांना भेट दिली का? असा संतप्त सवाल करून स्नेहल गायकवाड याला सरकारी गाडीने वेळेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असतें तर त्याचा जीव वाचला असता त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार डॉ. मेश्राम याचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावाकऱ्याकडून होतं आहें.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या