Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टरचे साहित्य चोरणाऱ्या आरोपीस अटक.

18 हजार रुपयांचा  चोरीचा माल हस्तगत भद्रावती पोलिसांची कारवाई 

 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : शहरातील फुकट नगर येथे घरासमोर ठेवलेल्या ट्रॅक्टरचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यास भद्रावती पोलिसांनी अटक केली असून त्याला सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे.

सुरज उर्फ गोलू भैय्याजी किनाके,वय 25 वर्षे, राहणार फुकट नगर असे या आरोपीचे नाव आहे. फुकट नगर येथील भारत गजानन नागपुरे यांचे ट्रॅक्टर घरासमोर ठेवले असता दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरची बॅटरी, स्टार्टर व इतर साहित्य असा 17 हजार 900 रुपयाचा माल चोरीच गेलेला आढळला. याची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली होती. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली. या आरोपीने सदर चोरीचा कबुली जबाब दिला. त्याच्याकडून चोरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.सदर कारवाई ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर,महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे,योगेश घाटोळे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या