Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांना महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार -2025 पुणे येथे सन्मानित.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :- रंग श्रावणाचा, भारत गौरव सन्मान सोहळा पुणे 2025 उत्साहात संपन्न, रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा राष्ट्र विकासाचा उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा, व संस्थांचा विलोभनीय राष्ट्र गौरव सन्मान सोहळा रविवार दिनांक-27/07/2025 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ- पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा -2025 मोठ्या उत्साहात संपन्न झाला, कार्यक्रमाचे उद्घाटक - तेजस बर्वे अभिनेता ( संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका) यांच्या हस्ते पार पडला, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - देवेंद्र काठे आमदार सोलापूर ( युवा धोरण समिती विशेष निमंत्रित सदस्य), अभिजीत करपे युवा उद्योजक, बी एन खरात, प्रकाश दिंडले, अभिनेते ( पाटलाच्या बैलगाडा व नटी न मारली मिठी ), दिलीप घे वंदे अभिनेते ( गोष्ट प्रेमाची स्टार प्रवाह), लक्ष्मी चव्हाण - अध्यक्ष शांताई फौंडेशन सोलापूर, स्वाती तरडे - अध्यक्ष विसावा फाउंडेशन पुणे, शर्मिला नलावडे पाटील - हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा पुणे, इत्यादी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलित करून भारत गौरव सन्मान सोहळा संपन्न, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील गायक प्रबोधनकार, भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांना शाल स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार 2025 सन्मानित करून जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी राजेश भांगे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार युवराज मेश्राम, गायक सदानंद मोरे, रामेश्वर पोहेकर, शाहीर गणेश मेश्राम, भीम शाहीर प्रदीप कडबे, मातृ रक्षा मासिकाच्या संपादिका स्वाती इंगळे, सुफी सय्यद क्षमसोदिन समाजसेवक, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा - शर्मिला नलावडे पाटील यांनी केले, सूत्रसंचालन बी एन खरात यांनी केले सर्वांचे स्वागत व आभार मानले, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या