Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक ९ जुलै रोजी शासकीय/ निमशासकीय /शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासन विरोधात तीव्र निदर्शने करणार

     
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध दर्शविण्याकरिता देशपातळीवर अकरा विविध कामगार संघटना एकत्र येऊन विरोध करणार असून त्यांच्या समर्थनार्थ राज्याचे शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा दिनांक ९ जुलैला दुपारच्या वेळेत तीव्र निदर्शने करणार आहेत. 
याबाबत रीतशीर शासनाला नोटीस दिलेली असून मागण्याची सनद सुद्धा दिलेली आहे त्यावर कुठलाही विचार सरकारने केलेला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन विरोधात असंतोष पसरत आहे. त्यामुळे या मागण्यांच्या शासन दरबारी विचार व्हावा या हेतूने दिनांक नऊ जुलैला निदर्शने प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात येणार आहे.
याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा भंडारा च्या कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले असता निमंत्रक तथा अध्यक्ष श्री रामभाऊ येवले, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चे राज्य सल्लागार तथा कार्याध्यक्ष ,कृतिशील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना श्री अतुल वर्मा, कोषाध्यक्ष श्री अरविंद चिखलीकर सहसचिव श्री पी.पी. लांजेवार, जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री दिलीप रोटके, श्री विशाल तायडे श्री सुनील मदारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होऊन त्यामध्ये निदर्शने कार्यक्रम जिल्हाभर करण्याचे ठरविण्यात 
आले. 
यावेळेस श्री बोरकर, प्रभाकर रामटेके ,मनोहर बावनकर, देविदास पडोळे, श्री शेंडे , सुधांशू नेवारे इत्यादींची उपस्थिती होती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या