Ticker

6/recent/ticker-posts

अणदूर येथील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था थांबवून पावित्र्य राखावे वचिंत बहुजन आघाडीच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी




मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र मो 9860179256 


 धाराशिव: - वचिंत बहुजन आघाडी चे धाराशिव जिल्हा सह सचिव आर यस गायकवाड यांनी धाराशिव  जिल्हा अधिकारी साहेब यांना अणदूर येथील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था थांबवून पावित्र्य राखावे असे निवेदन देण्यात आले आहे 
हुतात्मा स्मारकाची संरक्षण भिंतीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे, स्थानिक गुत्तेदार या कामाचा अनुभव नसतानाही नवख्या माणसाला हे हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यासाठी गुत्ते दिलं होतं,पण स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे.
मेन गेट बसवले नाही.त्यामुळे गावातील चार चाकी वाहने स्मारकात दिवसभर उभी असलेली दिसत असते,हे हुतात्मा स्मारक सध्या गाडी तळ म्हणून ओळखले जाते.
स्थानिक स्वराज्य संस्था दुर्लक्ष केल्याने स्मारकाचे पावित्र्य राखले जातं नाही.
याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हुतात्मा स्मारकाची दुरवस्था थांबवून संरक्षण भिंतीचे बांधकाम त्वरित चालू करून हुतात्मा स्मारकाचं पावित्र्य राखावे असे अणदुरच्या नागरिकांनी चर्चा सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व बाबींचा विचार करून आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या गावातील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अणदूर हुतात्मा स्मारकाचे दुरावस्था थांबवून संपूर्ण अर्धवट अवस्थेत असलेल बांधकाम त्वरित चालू करून हुतात्मा स्मारकाचं पावित्र्य राखावे अशी अणदूरवाशीयांची मागणी करत आहेत






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या