चित्रा न्युज प्रतिनिधी
टेंभुर्णी : माळेगांव (ता.माढा) येथील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते केशव गायकवाड यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या वह्यांचे प्रकाशन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि युवा नेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते शिवरत्न बंगला येथे करण्यात आले.
ग्रामपातळीपासून समाजप्रबोधन आणि आरोग्य रक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेणारे केशव गायकवाड आज तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. सामाजिक जाणीवेने केलेल्या त्यांच्या कार्याला सर्व स्तरातून दाद दिली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा करत केशव गायकवाड यांनी कोरोना काळात माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये 10 हजार होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करून आरोग्यविषयक जनजागृती घडवून आणली होती. त्यांच्या या उपक्रमाने गावागावांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण झाली होती.
केशव गायकवाड यांचे कार्य हे केवळ सामाजिकतेपुरते मर्यादित नसून, ते जनसेवेचा व्यापक दृष्टिकोन घेऊन काम करणारे कार्यकर्ते म्हणून परिचित झाले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे माळेगांव परिसरात समाजहिताच्या उपक्रमांना नवे बळ मिळत आहे.
कार्यक्रमास मा.सरपंच प्रमोद कुटे,मा.सरपंच दशरथ गोसावी,विलासकाका देशमुख,गोविंदभाऊ पवार,पत्रकार सतीश काळे,पंढरीकाका चंदनकर,हरिदास रणदिवे,आकाश पाटील,आण्णासाहेब माने,उपसरपंच अनिल मचाले,राजेंद्र काकडे,विनायक पराडे,सचिन मिसाळ,समाधान अनपट,सत्यवान केचे,सुभाष इंदलकर,प्रविण गायकवाड,बापु गलांडे,कांतिलाल नगरे,जगन्नाथ माने,सचिन श्रिखंडे,राजाभाऊ लोंढे,रजनीकांत माने,विशाल भोसले,वासुदेव माने,सोमनाथ साळुंके,सचिन श्रिखंडे,आकाश लोकरे,विकास गायकवाड,तुषार गायकवाड,शैलेश गोसावी,वैभव गोसावी,अधिकराव मिटकल, सुजित सुरवसे,राहुल ठेंगल,किरण राजगिरे व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
0 टिप्पण्या