गरीब रुग्ण जगला काय अन् मेला काय! याचे वरिष्ठांना देणे,घेणे नाही
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दवाखाण्यात येणा-या सिरियस रुग्णांसाठी तत्काळ शहरी भागात असलेल्या दवाखाण्यात पोहचता यावे,आणि वेळेत पुढील उपचार घेता यावेत.यासाठी प्रत्येक प्रा.आ. केंद्रात सर्व सोयीनियुक्त एक वाहन/ रुग्णवाहिका असते.आणि अशी एक रुग्णवाहिका हंडरगुळी येथील प्रा. आ.केंद्रात आहे.पण तीचे टायर खराब असल्याने तिलाच खरी ट्रिटमेंटची गरज आहे.परिणामी गोर गरीब रुग्णांना भाड्याचे वाहन करुन तालुका,जिल्हा ठिकाणी जावे लागते अशी माहिती हमजाभाई शेख,हाळी यांनी दिली आहे.
थोडक्यात माहिती अशी की,कांही दिवसापुर्वी हाळी(ता.उदगीर)येथील गरीब कुटूंबातील बाईलेक डिलिवरी करीता प्रा.आ.केंद्र हंडरगुळी येथे दाखल झाली होती.तेंव्हा तिला येथे कांहीवेळ ठेवुन योग्य ट्रीट केले.तरी पण त्या गरोदर महिलेला ञास होऊ लागल्याने उदगीर येथे रेफर केले.पन उदगीर जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक तयार होईना.याचे कारण जाणुन घेतले असता रुग्णवाहिकेचे टायर चांगल्या स्थितीत नाहीत. म्हणुन रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे जीव मी धोक्यात घालत नाही.असे म्हणत चालक आला नाही.म्हणुन गरीब कुटूंबातील रुग्णाला खाजगी वाहन करुन उदगीर येथे पुढील तपासणी करीता जावे लागले.आणि याबद्दल माहिती असूनही या प्रा.आ. केंद्राचे मेन इन्चार्ज अधिकारी असलेले महोदय हे प्रत्यक्षात केंद्रात उपस्थित न राहता फोनवरुन कारभार बघतात ! यामुळे येथे येणा-या रुग्णांचे कांही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण?असा सवाल हमजाभाई शेख टेलर हाळी यांनी वरिष्ठांना विचारला आहे.
*तालुका व जिल्हा*
*(THO , DHO) वैद्यकिय अधिकारी महाशयांचा नो,रिस्पाॅन्स !*
या प्रा.आ.केंद्रात जुनाट असलेल्या कांही कर्मचा-यांची मनमानी इतकी वाढली आहे की त्यांना अन्य कांही कर्मचारी सुध्दा वैतागलेत.तसेच कांही कर्मचा-यांचा देर से आना, जल्दी जाना ! यासारखा मनमानी कारभार वाढलाय.आणि परमानंट डाॅक्टर व रुग्णवाहिकेची दुरवस्था या सारख्या समस्यांबद्दल माहिती या दवाखान्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे.ते या सर्व प्रकाराकडे गाववाले म्हणुन दुर्लक्ष करतात. अशी माहिती स्ञि,पुरुष अशा २ कर्मचा-यांनी नाव गुपित ठेवायच्या अटीवर दिली आहे. म्हणुन ही व अन्य माहिती देण्या- घेण्यासाठी २ दोनदा फोन केला तरीही ना तालुका वैद्यकिय DHO अधिका-यानी रिस्पाॅन्स दिला.ना जिल्हा वैद्यकिय अधिका-यानी दिला.याचाच अर्थ असा होतो की,या प्रा.आरोग्य केंद्रात येणा-या गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या जीवाचे काय का होईना. याचे वरिष्ठांना देणे,घेणे नाही.
या दवाखान्यातील समस्या सोडवून त्या जुनाट कर्मचा-यांची तत्काळ बदली करावी,अन्यथा या सरकारी दवाखान्यातील गडबडीची रितसर तक्रार आरोग्यमंञ्याकडे करण्याची तयारी कांही जाणकार नागरिक करत आहेत.अशी चर्चा ऐकू येते.
0 टिप्पण्या